Wednesday, 20 March 2013

कळतंच नाही कसा येणार, शेतकऱ्याच्या पिकाला बहर.....


कधी निसर्गाची लहर
तर कधी राजकारण्यांचा कहर 
कळतंच नाही कसा येणार,
शेतकऱ्याच्या पिकाला बहर.


जेव्हा जेव्हा पडतो पाण्याचा दुष्काळ,
तेव्हा तेव्हा पडतो आश्वासनांचा पाऊस….
एकीकडे नाही प्यायला पाणी,
तर दुसरीकडे शेतात केळी आणि उस….

पूर्ण  पावसाळा जातो कोरडा,
उन्हाळ्यात मात्र सरीवर सर….
कळतंच नाही कसा येणार,
शेतकऱ्याच्या पिकाला बहर….

ह्यांच्या गाड्या आणि बंगले धुवायला,
धो धो - धो धो पाणी….
एका हंडाभर पाण्यासाठी मात्र,
आमच्या माता भगिनी फिरतात अनवाणी….

गावात रोज २४-२४ तास भारनियमन, मात्र 
लाईटच्या झगमगाटात न्हाऊन निघते शहर
कळतंच नाही कसा येणार,
शेतकऱ्याच्या पिकाला बहर…

एकीकडे संपूर्ण जनताच होरपळतेय दुष्काळात,
दुसरीकडे मात्र शाही जेवणावळी आणि थाटामाटात लग्न….
आमच्या पुढे मात्ररोजच्या भाकरीचे,
आणि पोरा-बाळांच्या शिक्षणाचे विघ्न.

आता पैसेच नाही राहिले शिल्लक ,
घ्यायला चमचाभर जहर,
कळतंच नाही कसा येणार,
शेतकऱ्याच्या पिकाला बहर...........?????

                ------ अतुल पारखे 


2 comments: