Wednesday, 20 March 2013

शाब्बास कलमाडी शाब्बास!


            शाब्बास कलमाडी शाब्बास!  आपण खुपंच महान कार्य केलेलं आहे. इतकं महान कि आपला ,समस्त पुणेकरांना बोलावून ,शनिवारवाड्यासमोर भव्य मंडप उभारून "न भूतो न भविष्यती" असा सत्कारच केला पाहिजे!

             खरं तर गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धा आयोजीत करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळाली होती. त्या संधीचं आपण सोनं करु शकलो की नाही हे माहित नाही परंतू कलमाडीनी  स्वता:चं घर मात्र सोन्याने भरवून घेतलं, यात मात्र कोणतीच शंका असण्याचे कारण नाही.

                  
पुण्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पैशांची अक्षरश: उधळपट्टी करण्यात आली. टॉयलेट चे टिश्यू पेपर हजारो रुपयाना ? ६०० रुपयांच्या खुर्च्या ७ ते ८ हजार रुपयांना विकत नव्हे ४५ दिवस भाड्याने ? गेले कित्येक वर्ष कलमाडी साहेब अध्यक्ष म्हणून काम पाहतात , मंग मला सांगा दुसरा  कोणी लायक माणूस नाही ह्या १०० कोटींच्या देशामध्ये ? सर्वाना समान संधी नको?
आज आमच्या देशामध्ये कोट्यावधी जनता दरिद्र्य रेषेखाली जगते आहे . कॉंगेस चे फक्त एकच "गरबी हटाओ" . मंग ६० वर्ष काय करताय? ६० वर्ष झाली एक १०-१२ वर्षाचा काळ सोडला सत्ता फक्त कॉंग्रेस च्याच हाती.  कलमाडिंवर आरोप होत असताना नामधारी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि हायकमांड(?) सोनिया गांधी यांच्या गप्प बसण्याचा नक्की काय अर्थ घ्यायचा?

                
ज्याना आपण २०-२० चे अनभिषिक्त सम्राट समजत होतो त्या ललित मोदी यानी हजारो कोटी हडप केले. त्यामध्ये कोणकोणते बडे मासे अडकले आहेत आणि ते प्रकरण कसे 
दाबले गेले हे नव्याने सांगायची गरज नाही. सर्व शिक्षा अभियनासाठी परदेशातून आलेल्या हजारो कोटी रुपयांचे काय झाले? हे शेंबड्या  पोराला सुधा माहिती आहे. राजस्थानातील दप्तरे महाराष्ट्रात विकायला. विद्यार्थ्याना खायला सडका तांदूळ. यासारखे आणिक कितीतरी घोटाळे आणि मंग नेहमीच आघाडीवर असणारे आमचे कलमाडी ह्या बाबतीत तरी माघार कशी घेतील.???

              
तिकडे कलकत्याला ७ रुपयांमध्ये ४५ किमी प्रवास आणि पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी ५ रुपये. बी आर टी च्या फालतू अट्टहासामुळे कितीतरी निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले. एकेकाळी समृद्ध असणार पुणे ह्यानी पार  भकाल करून टाकले. मेट्रो सारखा निर्णय घ्यायला ह्याना कित्येक वर्ष लागली. भूखंडांवर आरक्षण आणायची आणि मंग तेच भुखंड कवडीमोल भावाने बिल्डर लोकणा विकायचे असले तर ह्यांचे धंदे होऊन बसलेत.

            
तुमच्या असल्या भिकार वागण्यामुळे आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली जात आहे. तुम्हाला निवडून दिलेल्या लाखो गोरगरीब जनतेशिच तुम्ही प्रतारणा केली आहे. मी पुण्याचा सुपुत्र आहे अस सांगण्याचा आधिकार तुम्ही गमावला आहे.
                             ----- अतुल पारखे 


No comments:

Post a Comment