खरं तर ह्याच महाराष्ट्राने दिल्लीचे तख़्त हदरविले. मराठ्यान्नी अटकेपार झेंडे लावले. तरण्या पोरींना छेड़नारया लाचार पाटलाचे हात-पाय छाटले. क्रूरकर्मा अफझल खानाचा कोथला बाहेर काढला.जुल्मी शाहिस्तेखानाची बोटे सुद्धा कापली. एवढेच काय पण इथल्या संत साहित्याने तर संपूर्ण जागालाच तत्वज्ञान शिकविले. पण माझ्या ह्या महाराष्ट्राच्या गौरवशाली आणि वैभवशाली परंपरेलाच सुरुंग लावण्याचे काम इथल्या नालायक राज्यकर्त्यांनी केले.
ज्यांची मूर्ति लहान पण कीर्ति महान होती असे देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान 'लालबहाद्दुर शास्त्री" यांनी नारा दिला "जय जवान! जय किसान!". शेतकरी देशाचे पोट भरतील तर सैनिक देशाचे रक्षण करतील. ज्यांनी तिरंग्याच्या रक्षनासाठी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयासाठी बांधलेल्या "आदर्श" वास्तुमध्ये भ्रष्टाचार करण्याचे काम ह्या महाराष्ट्रातील राजकीय "गिधाडान्नी" करून महाराष्ट्राच्या आदर्श प्रतिमेलाच काले फासले आहे.
इकडे कोट्यवधी लोकांना खायला दोन टाइम पोटभर अन्न मिळत नाही. कुपोषित बालकांची संख्या वाढत चालली आहे. मुलभुत शिक्षण चांगल्या प्रकारे मिळत नाही. पोषण आहारामध्ये आळ्या शिजवल्या जातात. भर दिवसा पाच वर्षाच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार केला जातोय अन सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा न्याय्य मिळविन्यासाठी सत्तर वर्षाच्या आज्जिबाई कोर्ट- कचेरया मध्ये आजही हेलपाटे मारताना दिसतात.
पण गोर-गरीबाच्या हक्काचे, कष्टाचे अन घामाचे , ह्या देशातील तमाम जनतेचे लुबाडलेले २८० लाख कोटि रुपये स्विस बैंकेत लपविन्यात मग्न असनारया ह्या देशातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना मात्र ह्या सर्व प्रकाराचे काहीही सोयरसुतक नाही हीच मोठी खेदाची बाब आहे.
आपल्या देशाचे खरे शत्रु पाकिस्तान, दहशतवाद, नक्षलवाद हे नसून सुरेश कलमाड़ी, ए. राजा, अशोक चव्हाण ह्या सारखे भ्रष्ट राजकारणी ह्या देशाचे खरे शत्रु आहेत पण इथली लोकशाही त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही हीच मोठी शोकांतिका आहे .

No comments:
Post a Comment