Thursday, 21 March 2013

स्वातंत्र्याची दुसरी लढाई


   होय, शेवटी अन्नानी रणशिंग फुंकले. स्वातंत्र्याच्या दुसरया लढाईसाठी त्यांनी हाक दिली. सम्पूर्ण देश जागा झाला. तरुनाई कधी नव्हे तो इतक्या जल्लोशाने ह्या आन्दोलनामध्ये सहभागी झालीरूशी पासून कृषि पर्यंत, शेती पासून शेत करयापर्यंत, रंग्यापासून तिरंग्या पर्यंत, सचिनच्या षटकारापासून  तर  ऐश्वर्याच्या ठुमक्यापर्यंत आणि गल्ली पासून दिल्ली पर्यंत, सर्वच ह्या लढाई मध्ये सहभागी झाले होते.
          
भारत त्यावेळीही तसाच होता आणि आजही तसाच आहे, फरक फ़क्त एवढाच आहे की त्यावेळी इंग्रजांच्या हातात सत्ता होती आज नेत्यांच्या हाती सत्ता आहे. पण दुःख एकच गोष्टीचे वाटते की त्यावेळी परकीय लोक आपल्यावर अन्याय करायचे आज मात्र आपलेच लोक आपल्यावर अन्याय करतात आणि मंग मनामध्ये प्रश्न उभा राहतो "शिवरायांच्या भुमिमध्ये आम्ही सारे शंढ कसे?, पायाखाली आग तरी डोके आमचे ठण्ड कसे? "

 किती दिवस चालणार हे सारं???
                   मुघलांचे राज्य आपल्यावर होते, सामान्य माणुस आन्याय-अत्याचाराने ग्रासला होता. आणि मंग तुकड्यांत विभागलेल्या आणि जाती धर्मात दुभंगलेल्या महाराष्ट्राच्या आस्मिता जागविन्याचे कम एका जहागीर दाराच्या पोराने केलं. होय नाव शिवाजी. हिन्दवी स्वराज्याची स्थापना त्याने केलि. तेव्हा सर्वांना वाटले की आता "रामराज्य येणार रामराज्य येणार" खरच रामराज्य आलं. जनतेचे राज्य आले. पण ते राज्य फार काळ टिकले नाही. त्याला मराठ्यांच्या फंद-फितुरिचे ग्रहण लागले आणि मंग ब्रिटिश ह्या देशात आले. ह्या देशातील गोर गरिबांना त्यांनी लुटले, सामान्न्यांचा छळ केला. पुन्हा १५० वर्ष संघर्ष! सावरकर, नेहरू, गांधी, लोकमान्य, फुले आशा असंख्य नेत्यांनी, क्रांतिकारकांनी संघर्ष केला आणि १५ august १९४७ साली  देश स्वातंत्र्य झाला. तेव्हा सर्वांना वाटले की नाही आता तरी "रामराज्य येणार, रामराज्य येणार"; पण मित्रांनो राम राज्य कही आलं नाही. तर राज्य आलं भ्रष्टाचाराचे, राज्य आलं दहशतवादाचे. गोरे इंग्रज गेले आणि हे काळे इंग्रज आले.
           फ़क्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ह्या दिवशी एखाद्या महासागराप्रमाने प्रमाने उफालुन येणारं आपलं हे भारत देशावरंच  प्रेम उरलेल्या ३६३ दिवस सरस्वती नदिप्रमाने लुप्त होउन, स्वहित मंग ते वाम मार्गाने का असेना जपन्यातंच लोप पावते ह्यातंच आपल्या भारतीय विचारवंतांचा आणि समाज सुधारकांचा पराभव आहे असे मला वाटते.
 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मृत्युलाही लाजविनारी काळया पाण्याची शिक्षा भोगली पण आज आपल्या या समाजामध्ये काळया पैशाकारिता सन्मानाने तुरुन्गाची थंड हवा खाणारी गिधाडेच ह्या देशामध्ये वाढली आहेत हीच मोठी शोकांतिका आहे.
              राजा हजारो कोटि रुपयांचा घोटाला करून तिकडे तुरुंगात मस्त आराम करतोय. कर नाही त्याला डर कशाला? फ़क्त JPC नेमा ह्या एका मागणीसाठी ह्यांनी एक पूर्ण अधिवेशन वाया घालविले. आता लोकलेखा समितीचा अहवाल स्विकारन्याची ह्यांची मानसिकताच दिसत नाही.सुरेश कलमाड़ी! ह्यांचं  नाव ऐकलं तरी तळ पायाची आग मस्तकात जाते. लाज सुद्धा नाही वाटत ह्या माणसाला किंवा केलेल्या कृत्याचा पश्चाताप देखिल नाही. इतका मुजोरपना ह्या देशने कधीच पहिला नव्हता. पन्तप्रधानाबद्दल काय बोलावं आपण. ह्यांना तर स्वताचं मतंच नाही. madam नी सांगायचं आणि ह्यांनी ऐकायचे. शरद पवार ! त्यांना क्रिकेट मधील धावांची पडलेली असते परन्तु इकडे आमचा शेतकरी दिवसभर उन्हातान्हात शेताच्या ह्या बांधापासून तर त्या बांधापर्यंत धावा काढत असतो त्याचं मात्र कुनालांच कही नाही. ह्यांनी धान्याची गोदामे सडविली पण तिकडे आमच्या देश बांधवांना एक वेळचं अन्न देखिल नशिबी नाही. ह्या देशातील आई आपल्या लहान्यासाठी  पीठामध्ये पानी टाकुन दूध तयार करते. राज्यातल्या राज्यकर्त्यांबद्दल काय बोलायचे?? दिल्लीत मुजरा करण्यात ते आपली धन्यता मानतात. 
            
लोकमान्य म्हणाले होते "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनाराच" पण आज आपल्या समाजात अन्याय अत्याचार करणे हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनाराच असे म्हणणारे आणि त्याप्रमाणे वागुण जनतेला पिळणारेच राजकारणी जास्त दिसतात.
       पंडित नेहरु म्हणाले होते "आराम हराम है" पण आज आपल्या देशामध्ये आरामातच राम माननारयांची संख्या जास्त वाढली आहे.
            ज्यांची मूर्ति लहान पण कीर्ति महान होते असे कर्तुत्ववान पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांनी नारा दिला "जय जवान जय किसान" पण आज आत्महत्या करणारे शेतकरी आणि सीमेवरील हतबल जवान पाहिल्यावर खरंच चिड येते.
          "अहिंसा परमोधर्म" हे महात्मा गांधींचे विचार भारतातल्या हिन्सेच्या वादळात कधीच विरून गेले आहेत असे वाटते.
             मुला-मुलींना शिक्षण मिळावे म्हणून सावित्री बाईन्नी स्वताचे दागिने विकले. पण आज आपल्या लहान मुलांच्या खाऊच्या, खिचडीच्या पैशातून  आपल्या बायकोच्या गळ्यात किलोभर दागिने घालणारे शिक्षण सम्राट निर्माण झाले. आहो आज "विद्यालये वाढली" असं सगळे म्हणतात पण "विद्या लयाला गेली" असं कुणीच म्हणत नाही.
              "मै मेरी झाशी कभी नाही दूंगी" असं इंग्रजांना ठणकाविणारी झाशीची रानी शौर्याने अमर झाली. पण आज ह्या छत्रपति शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीचा फाटलेला पदर खुप काही सांगुन जातो.

            किती काळ आपण नुसतं हे सारं पाहत राहणार आणि सिस्टम ला दोष देणार? प्रत्येकानेच जर ठरवले तर काय करू शकत नाही? एक ठिणगी सम्पूर्ण जंगल बेचिराख करू शकते. आपल्याला आपल्या विचारांची मशाल पटवायची आहे. उठा बंधू आणि भगिनींनो! जागे व्हा! क्रन्तिला सज्ज व्हा

 प्रत्येकाने फक्त एवढेच ठरवायचे आहे.
               "ह्या काळ्याकुट्ट अंधाराने वेढलेल्या जगात नाही मी प्रखर दीवा लावू शकणार! परन्तु माझ्या मिण-मिणत्या पणतिची छोटीशी प्रकाशरेखा थोडा तरी अंधार छेदू शकेलंच ना???"



No comments:

Post a Comment