Wednesday, 19 June 2013
Wednesday, 8 May 2013
गिर्यारॊहकांची पंढरी – हरिश्चंद्रगड!
हरिश्चंद्रगड...पहाड्यांच्याहीवर डोकारणारी उंचच उंच झाडे, वेली, पशू, पाखरे यांचं जणू काही घर आहे. आकाशालाही गवसणी घालणारे पवर्त, दऱ्या-खोऱ्या आणि काळीज पिळवटून टाकणारी वारा, वांदळ यांचं जणू काही गाव आहे आणि म्हणूनंच गिर्यारॊहकांची पंढरी हे हरिश्चंद्रगडाचे दुसरे नाव आहे.
वार शनिवार पाच
दिवस ऑफिसमध्ये काम केल्यानंतर शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत झोपणे हा जणू काही
प्रत्येक संगणक अभियंत्याचा जन्मसिद्ध अधिकारंच... पण आजचा शनिवार त्याला अपवाद
होता. आजचा शनिवार भल्या पहारे पाचलांच सुरु झाला होता. कारण आज एका मोहिमेची
सुरुवात होणार होती. ट्रेक अनलिमिटेड हा आमचा सायबेज सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कायर्रत
असलेला ग्रूप. अनेक उंच किल्ले, पवर्त, सह्याद्रीच्या रांगा अशा कितितरी ठिकाणी
ट्रेकिंगचे आयोजन करून या ग्रूपने कंपनीतील प्रत्येकाच्याच मनात एक निमार्ण केले
आहे. ह्याच ग्रूपने आयोजित केलेल्या एका नव्या मोहिमेसाठी आम्ही २२ जण सज्ज होत
होतो.
एक दिवस
मुक्कामी जायचे असल्यामुळे बरोबर घ्यावयाच्या प्रत्येक गोष्टीची काळजीपुवर्क छाणनी
चालली होती. टॉर्च, मेणबत्ती, माचिस, ट्रेकिंग सुट, पुरेसे पाणी, दोन दिवस टिकु
शकेल असे अन्न अशा खूप काही गोष्टी आणि जोडीला तुडूंब भरलेला उत्साह...
सकाळी ६ वाजता
कंपनीमध्ये पोहोचले. तेव्हा गाडी आली होती आणि ४-५ अतिउत्साही कार्यकर्ते देखील निरंजन,
प्रितेश, श्रेयश आणि वरुण, ट्रेक अनलिमिटेड ग्रूपचे केयूर यांची लगबग चालू होती.
सगळ्या वस्तू बरोबर घेतल्यात ना? कोण कोण आहे... कुणाला काही समस्या तर नाही ना...
याची कसून चौकशी ते करत होते. शेवटी एकदाची शिरगणती झाली आणि आम्ही प्रवासाला
सुरुवात केली.
मी मुळचा जुन्नरचा . त्यामुळे तेथील
निसर्गसंपद्दा, रस्ते, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे यांची इत्यंभूत माहिती
माझ्याकडे होती. वाटेत जाताना अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या विघ्नहराचे (ओझर) दशर्न
घेऊन प्रत्येक जण “आमची मोहिम यशस्वी होवो” अशी जणू काही प्राथर्णाच करत होता.
खिरेश्वर गावाकडे जाताना लागलेला खुबीचा बंधारा आणि त्याचा विशाल जलसागर जणू काही जुन्नरच्या नैसर्गिक
श्रीमंतीची साक्ष देत होते. त्या पाण्यावर स्वच्छंदपणे विहार करणारे बगळे मनाला
उल्हासित करत होते. खुबीच्या बंधाऱ्याच्या वाटेवरून जाताना सगळे झोपेतून जागे
झाले. कारण रस्त्याची अवस्था खूपच विचित्र होती. खिरेश्वर गावातून तुडूंब भरून
येणाऱ्या जीप “पिपली लाईव्ह” चे दृष्य डोळ्यासमोर उभ्या करत होत्या. अर्थातच आम्ही
एका सुशिक्षित, विकसित, महासत्तेची स्वप्नं बघणाऱ्या एका प्रगत इंडियामधून एका
अजूनही स्वातंत्र्यपुर्वे काळातील जीवन जगणाऱ्या भारतामध्ये आलो होतो.
“आपण सहलीसाठी
किंवा वर्षाविहारासाठी आलेलो नसून गिर्यारोहनासाठी आलेलो आहेत आणि म्हणूनंच
लष्कराप्रमाणे शिस्त महत्वाची” हा केयूरने दिलेला कानमंत्र मनाशी घोळवत आम्ही
चढाईला सुरुवात केली. निसर्गाचे एक अद्भूत रूप आम्हाला त्याठिकाणी पहायला मिळाले . अगदीच
छोट्याश्या असणाऱ्या पायवाटा, एका बाजूला उंचच उंच पहाड तर दुसऱ्या बाजूला तितकीच
खोल दरी. पावसाच्या पाण्यामुळे घसरणाऱ्या वायवाटा आणि भरदिवस घाबराबयाला लावणारी
घनदार झाडी यामधून मार्ग काढत आम्ही चाललो होतो. एव्हाना “IT इफेक्ट” दिसायला
लागला होता. आजू-बाजूला AC आणि बसायला आरामखुर्ची ह्यापैकी तेथे काहीच नव्हते. जवळ
होत्या त्या फक्त कड्या-कपारितून, गवतातून अन् तीव्र उतारावरून जाणाऱ्या वाटा.
प्रत्येक वळणावर पाय घसरून पडणाऱ्या शांताची (गिर-जा) गिरिजा कधी झाली आम्हाला
कळलंच नाही आणि आम्ही सर्व तरुणांना लाजवत सगळ्यांच्याही पुढे धाव घेणारी केतकी
जणू काही आमच्या बटालियनची कॅप्टनंच झाली होती.
एव्हाना आम्ही गड काबीज केला होता.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान होते . एक आनंद होता.
एका लेण्यामध्ये आम्ही बरोबर आणलेल्या बॅग्ज ठेवून घाईघाईतच जेवण उरकले. कारण
आम्हाला सूर्य अस्ताला जाण्यापुर्वी कोकणकडा गाठायचा होता. आम्ही कोकण कड्याला
जाण्याची वाट धरली. दिवस मावळतीकडे झुकला होता. पुन्हा अर्धा तास पायपीट
केल्यानंतर कोकणकड्याचे खरोखरंच अप्रतिम दृष्य काळजामध्ये धडकी भरतणारे होते. पुढे
होवून डोकविण्याची सुद्धा हिम्मत कुणामध्ये होत नव्हती. आणि मग आपोआपच “राकट देशा,
कणखर देशा, दगडांचा देशा” ह्या अजरामर कवितेच्या ओळी ओठावर घुमु लागल्या.
दुसऱ्यादिवशी
आम्ही सकाळी ६ वाजताच सुरुवात केली. सह्याद्री पर्वतरांगावरील कळसुबाईनंतरचे
सर्वात उंच शिखर म्हणजेच तारामती पीक, घनदार जंगलातून जाणारी खडतर वाट, अंगावर
येणारे आणि क्षणात दिसेनासे करणारे दाट धुके आणि सोसाट्याचा वारा ह्या सर्वाना छेदत
आम्ही तारामती पीक सर केले सुद्धा! सर्वात उंचीवरील शंकराची आकर्षक पिंड खुपच
मनमोहक होती.
गडावरील
हरिश्चंद्रवराचे मंदिर जणू काही प्राचीन कलाकृतीचा आकर्षक नमूना आहे. संत
चांगदेवानी “तत्वसार “ हा ग्रंथही ह्याच
मंदिरामध्ये लिहिला. पुढच्या पिढिलाही ह्या सुंदर, कलाकृतीचा अनुभव द्यावयाचा असेल
तर पुरातत्व विभागाने ह्या मंदिराची डागडूजी करणे गरजेचे आहे.
दोन दिवसांची
मोहिम फत्ते करून खिरेश्वरला
पुन्हा आल्यानंतर आम्ही परतीची वाट धरली एका सुंदर, संपन्न भारतातून एका MODERN इंडियाकडे...
Sunday, 7 April 2013
सीमावासियांशिवाय महाराष्ट्रदिन...?
1 मे.
महाराष्ट्राचा
स्वातंत्र्य
दिन!
पण हे स्वातंत्र्य सहजासहजी नाही मिळालं. त्यामागे तमाम मराठी बांधवांची जिद्द होती, एकजुट होती. 105 मराठी बांधवांची रक्ताचा अभिषेक घातला , तेव्हा कुठे आम्हाला आमचा महाराष्ट्र मिळाला.
परंतू
भाषावार
प्रांत
रचना
करुनदेखिल
तिकडे
आज
हजारो
नव्हे
तर
लाखो
मराठी
बांधव
कानडी
सरकारच्या
अत्याचाराला
बळी
पडत
आहे.
गुराढोरांसारखं
त्यानां
बदडवुन
काढलं
जातंय.
आणि
या
महाराष्ट्राचे
लाचार
मंत्री
तिकडे
दिल्लित
मूजरा
करतातेत.
आरे
शिवाजी
महाराजांच्या
महाराष्ट्रात
तुम्ही
जन्मलात
ना?
मंग
थोडीशी
लाज
तरी
वाटु
द्यात!
आज
आपण
महाराष्ट्र
दिन
मोठ्या
दिमाखात
साजरा
करतो.
परंतु
जोपर्यंत
बेळगावसह
संपुर्ण
मराठी
भाषक
प्रदेष
महाराष्ट्रात
येत
नाही
तोवर महाराष्ट्र दिन साजरा करणं म्हणजे सिमावासियांची क्रूर चेष्टाच
म्हणावी
लागेल.
आपले ही काही विचार असतील. आपणही नक्की share करा. जेणेकरून सर्वांमध्ये एकसंध महाराष्ट्राची आस पुन्हा एकदा जागृत होइल. प्रत्येकानेच ठरवले तर काय करू शकत नाही? एक ठिणगी संपूर्ण जंगल बेचिराख करू शकते. आपल्याला आपल्या विचारांची मशाल पेटवायाची आहे. उठा, जागे व्हा!
क्रन्तिला सज्ज व्हा !
जय महाराष्ट्र !!!
Thursday, 21 March 2013
शेतकरयांचा जाणता राजा ????
असंख्य क्रांतिकारकांच्या आणि विचारवंतांच्या रकताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याची ज्ञ्यानेश्वरी लिहीली गेली. स्वराज्य मिळाले पण आपण त्या स्वराज्याचे "सुराज्य" करू शकलो नाही हीच मोठी शोकांतिका आहे.
"जानता राजा" असं शरद पवार साहेबांना मोठ्या आदराने संबोधले जाते पण मला सांगा शेतकऱ्यांसाठी त्यांनी नक्की काय केलं?
कृषिमंत्री महाराष्ट्राचा असुन सर्वात जास्त आत्महत्या फ़क्त महाराष्ट्रातंच होतात. प्रथम मोफत विजेची गाजरे दाखविली आणि निवडणूका जिंकून परत शेतकर्यांच्या तोंड़ालाच पाने पुसली . तोट्यात चाललेल्या बैंका वाचविण्यासाठी खोटी कर्ज माफ़ी केलि. जे शेतकरी वेळेवर कर्जाचे हप्ते भरतात त्यांना कर्ज माफ़ी नाही मात्र ज्यांनी हप्ते थकाविले आशा सर्वान्ना मात्र १०० % कर्ज माफ़ी .
कृषिमंत्री महाराष्ट्राचा असुन सर्वात जास्त आत्महत्या फ़क्त महाराष्ट्रातंच होतात. प्रथम मोफत विजेची गाजरे दाखविली आणि निवडणूका जिंकून परत शेतकर्यांच्या तोंड़ालाच पाने पुसली . तोट्यात चाललेल्या बैंका वाचविण्यासाठी खोटी कर्ज माफ़ी केलि. जे शेतकरी वेळेवर कर्जाचे हप्ते भरतात त्यांना कर्ज माफ़ी नाही मात्र ज्यांनी हप्ते थकाविले आशा सर्वान्ना मात्र १०० % कर्ज माफ़ी .
आणि आता तर " कर्ज मफिचा कंटाळा आला आहे " असे बेजबाबदार विधान पवार साहेबांनी केले आहे. मोफत विज शेताकर्यान्नी मागितली होती तुमच्याकडे? आमचे कर्ज माफ़ करा असे शेतकरी म्हणाला होता? शेतकर्यांना मोफत विज नको आहे . तर त्याना " माफक दरात आणि मुबलक प्रमाणात विज" हवी आहे.
" शेतकरयांन्नी आर्ट ऑफ़ लिविंग चा कोर्स करावा " ही आक्कल त्यांना शिकाविन्याची आता गरज नाहीये. घरामध्य्ये लग्नाची जवान पोरगी आहे , तिच्या लग्नाला हुंडा कोठून आणायचा? , मुलाचे शिक्षण बाकि आहे , पाउस पडत नाही, जमिनीत पेरलेले उगवेल काय? बैंक जप्ती तर करणार नाही ना? आशा असंख्य संकट समोर आसताना मरणाच्या दाराशीपोहोचलेल्या शेत कर्यान्नी "आर्ट ऑफ़ लिविंग करावा " हा फुकट चा सल्ला देवून तुम्ही त्याचा घोर अपमान केला आहे.
लोकांना आज खायला अन्न मिळत नाही आणि तिकडे गोदामात लाखो टण धान्य तुम्ही सड़विले. शेतकर्यांचे गहू १० रुपये दराने खरेदी करायचे आणि परदेशातील सडका गहू जो त्याठिकाणी जनावरांना ही चारला जात नाही तो दुप्पट दराने खरेदी करायचा. याला काय म्हणायचे?
आज इकडे दुधाला चांगला भाव मिळत नाही आणि ह्यांनी तिकडून थाईलैंड मधून दुधाची भुकटी आयात केलि. शेतकरयांन्नी हजारो लिटर दूध ओतून संताप व्यक्त केलेल्यानंतर तिकडे त्या थाईलैंड सरकारला जाग आली , त्यांनी निर्यात थाम्बविली पण आमच्या कृषि मंत्र्यांना काय जाग आली नाही.
शेतकरयांना आनुदान द्यायचे म्हटले कि ह्यांच्या पोटात गोळा उठतो . तिजोरीत खडखड़ाट आहे असा आरडओरडा केला जातो, मग IPL ला मात्र करमुक्त करण्यासाठी तुमच्या तिजोरीत बरा खडखड़ाट नसतो? माझ्यावरचा बोजा कमी करा , कृषि खात्याची जबाबदारी दूसरी कोनावरती दया आणि मला ICC चा कारभार करू दया, म्हणजे कृषि खाते तुम्हाला बोजा वाटते. शेतकरी तुम्हाला निरर्थक वाटतात
पवार साहेब ,
महाराष्ट्रातील कोट्यवधी
शेतकरी आत्महत्या करत असताना, सीमाभागातिल जनता ५० वर्षापासून अन्यायामध्ये जगत
असताना आणि असंख्य लोक उपासमारीने मरत असताना आपण आपली सर्व शक्ति
IPL साठी, आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी खर्च करावी कारन
महाराष्ट्राच्या विकासाची आपल्याकडून आपेक्षा करने आता व्यर्थ
आहे……….
इंग्रज लोक आपल्या बांधावान्वर आन्याय करायचे. पण एवढे काय वाटायचे नाही कारन ते परके होते पण आज आपलेच लोक आपल्या बांधावान्वर अन्याय करतात ह्यापेक्षा दुसरे दुर्भाग्य कुठले असूच शकत नाही!!!!!
Subscribe to:
Posts (Atom)

