Sunday, 7 April 2013

सीमावासियांशिवाय महाराष्ट्रदिन...?

1 मे. महाराष्ट्राचा स्वातंत्र्य दिन!
             पण हे स्वातंत्र्य सहजासहजी नाही मिळालं. त्यामागे तमाम मराठी बांधवांची जिद्द होती, एकजुट होती. 105 मराठी बांधवांची रक्ताचा अभिषेक घातला , तेव्हा कुठे आम्हाला आमचा महाराष्ट्र मिळाला.

            परंतू भाषावार प्रांत रचना करुनदेखिल तिकडे आज हजारो नव्हे तर लाखो मराठी बांधव कानडी सरकारच्या अत्याचाराला बळी पडत आहे. गुराढोरांसारखं त्यानां बदडवुन काढलं जातंय. आणि या महाराष्ट्राचे लाचार मंत्री तिकडे दिल्लित मूजरा करतातेत. आरे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही जन्मलात ना? मंग थोडीशी लाज तरी वाटु द्यात!
             आज आपण महाराष्ट्र दिन मोठ्या दिमाखात साजरा करतो. परंतु जोपर्यंत बेळगावसह संपुर्ण मराठी भाषक प्रदेष महाराष्ट्रात येत नाही तोवर महाराष्ट्र दिन साजरा करणं म्हणजे सिमावासियांची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल.
         आपले ही काही विचार असतील. आपणही नक्की share  करा. जेणेकरून सर्वांमध्ये एकसंध महाराष्ट्राची आस  पुन्हा एकदा जागृत होइल. 

   
प्रत्येकानेच ठरवले तर काय करू शकत नाही? एक ठिणगी संपूर्ण जंगल बेचिराख करू शकते. आपल्याला आपल्या विचारांची मशाल पेटवायाची आहे. उठा, जागे व्हा!

  क्रन्तिला सज्ज व्हा !

जय महाराष्ट्र !!!

2 comments:

  1. जोपर्यंत कॉंग्रेस सरकारला सत्तेवरून खेचून त्याचा विसर्जन केला जात नाही तोपर्यंत कोणत्याच मराठी माणसाचा… नव्हे तर कोणत्याच भारतीयाचा कोणताच प्रश्न सुटणे अश्यक्य आहे.

    ReplyDelete