सलमान खान यास,
काल न्यायालयाने तुझ्यावरील सर्व आरोप सिद्ध करत तुला दोषी ठरवलं आणि सजा देखील सुनावली. अभिनय क्षेत्रात दबंगगिरी करणारा कलाकार प्रत्यक्ष जीवनात रडताना पाहून वाईट वाटले. अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये तू खूप चांगली कामं करतो आहेस असं मी ऐकलं. तसाच तू मनाने खूप चांगला आहेस, सिनेसृष्टीत कित्येकांना तू स्वत्ताच्या पायावर उभं केलेलं देखील मी ऐकलं. पण त्याबरोबरच, बऱ्याच वेळा दारू पावून धिंगाणा, स्वत्ताच्याच सुरक्षा रक्षकास मारहाण, निष्पाप काळविटाची शिकार यांसारखे अनेक प्रकार देखील आम्ही अनेकवेळा पाहिले. तेव्हा तुझ्याशी थोडं बोलावं म्हणून हा पत्र प्रपंच.
तू एक चांगला माणूस आहेसच, यात शंकाच नाही. पण स्वत्ताला वाचविण्यासाठी तू इतकं खोटं बोलशील असं आजीबात वाटलं नाही. त्यामुळे मला तर तुझ्या चांगुलपणावरच शंका येते. गाडी मी चालवत नव्हतो तर माझा चालक चालवत होता, म्हणजे स्वत्ताची मस्तवाल चमडी वाचविण्यासाठी तू त्या निष्पाप अशोक सिंगची, ज्याने तुझी २० वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केली, त्याचीही तू कुर्बानी द्यायला निघाला होतास?
आणि अशोक सिंगने देखील सर्व आरोप स्वत्तावर घेतले ह्याला मालकाप्रती असलेली इमानदारी समजून त्याचं कौतुक करावं कि सन्माननीय न्यायाधीश साहेबाच्या समोर असलेला हातोडा घेवून त्याचं डोकं फोडावं हेच आम्हा सामान्य माणसाला कळत नाही.
तू तुझ्या मित्रांबरोबर अपघाताच्या आधी जुहूच्या हॉटेल मधून मद्य न घेता फक्त पाणी पिवून बाहेर पडलास. खरंच, हे ऐकून तुझ्या चांगल्या वर्तनाबद्दल खात्रीच पटली.
तुझ्या खोटारडेपणाचा सगळ्यात मोठा बळी ठरला तो म्हणजे रविंद्र पाटील. तो तर तुझा अंगरक्षक होता. पण त्याआधी देशसेवेला वाहून घेतलेला इमानदार पोलिस होता. स्वत्ताच्या खरेपणाची एवढी मोठी शिक्षा कदाचितच दुसऱ्या कुणाला मिळाली असेल. त्याने तुझ्याविरोधात साक्ष दिल्यावर पुढे त्याच्या कुटुंबाने साथ सोडली. सहकाऱ्यांनी दूर लोटलं. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. प्रचंड तणावामध्ये गेला. पण त्याने शेवट पर्यंत साक्ष नाही फिरवली. तू तुझ्या समाजसेवेचा भाग म्हणून त्याला काही पैसेही देण्याचा प्रयत्न केला असशिलच पण तो विकला गेला नाही. बिचारा तणावाने आणि TB ने खंगून खंगून मेला.
सल्लू भाई, तू करत असलेल्या समाजसेवेचा आणि तुला झालेल्या शिक्षेचा काय संबंध…???
समाजसेवा करणं म्हणजे काही गुन्हेगारी करण्यासाठी permit नव्हे. तसं जर असतं तर अण्णा हजारे, बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ यांसारखी माणसं हजारो गुन्हे करू शकतील इतकं मोठं त्यांचा सामाजिक कार्य आहे.
भाग्यवान आहेस सलमान भाई तू! खूप चांगले मित्रं मिळाले तुला. तुला शिक्षा झाल्यावर अगदी सगळ्यांनी एका सुरात गळा काढायला सुरुवात केली आणि ह्याच्यात सर्वात पहिला नंबर मिळविला आभिजीत भट्टाचार्यने. पण त्या अभिजित भट्टाचार्याला हे देखील कळायला नको कि, फुटपाथ हि जशी झोपण्यासाठी नसते, तशी ती गाडी चालवण्यासाठी सुद्धा नसते. स्वत्ताच्या आवाजाप्रमाणेच कधीतरी डोक्याचा पण चांगला वापर कर ना म्हणावं त्याला ! तुझ्याबद्दल ह्यांना सहानुभूती वाटते ह्याचं आम्हाला दुखं नाही पण बळी गेलेल्या सामान्य माणसांबद्दल कधी ह्यांनी चकार शब्द काढला आहे का आजपर्यंत?
गेली २ दिवस राजकारणी आणि सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी तुझ्या घरी येवून तुला सहानुभूती दाखवत आहेत. चांगली गोष्ट आहे. पण यातील एकाला देखील १ दिवस रवींद्र पाटील च्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करावसं वाटलं नाही, ह्याचं दुखं वाटतं.
आता तुझ्यासारख्या मोठ्या माणसाने शिक्षेला घाबरायची काहीच गरज नाहीये. दर १०-१५ दिवसांनी नक्कीच तुला तुरुंगातून रजा मिळेल. हवं असल्यास संजूभाईची मदत घे. ह्याकामी त्याचा अनुभव दांडगा आहे. आणि घाबरू नकोस मित्रा. तुला तुरुंगात गेल्यावर काही कामे करावी लागणार नाही. कारण कारावास हा सामान्य माणसांसाठी असतो. तुमच्यासाठी आत काय आणि बाहेर काय? मज्जाच मज्जा.
तुझं तुरुंगात गेल्यामुळे जरी आर्थिक नुकसान होणार असलं तरी प्रसिद्धीच्या बाबतीत आजीबात घाबरू नको. ज्यावेळेस तू मुंबईच्या घरापासून येरवडा तुरुंगात यायला निघशील त्यावेळेस पूर्ण रस्त्याने तुझी न्यूज कव्हर केली जाईल आणि लाइव्ह दाखीविली जाईल. आणि मग आमच्या घरातील माता भगिनीच कशाला तर तरुण देखील तुला तुरुंगात जाताना पाहताना धाय मोकलून रडू लागतील!
अजून काय लिहू. आता मला देखील रडू आवरत नाही.
कळावे, काळजी घे!
अतुल पारखे.

Very Well Written bro.. Practical and to the fact!!
ReplyDeleteNice one Atul...
ReplyDeleteEk Number...!!!
ReplyDelete