Thursday, 21 March 2013

शेतकरयांचा जाणता राजा ????


असंख्य क्रांतिकारकांच्या आणि विचारवंतांच्या रकताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याची ज्ञ्यानेश्वरी लिहीली गेली. स्वराज्य मिळाले पण आपण त्या स्वराज्याचे "सुराज्य" करू शकलो नाही हीच मोठी शोकांतिका आहे.
"जानता राजा असं शरद पवार साहेबांना मोठ्या आदराने संबोधले जाते  पण मला सांगा शेतकऱ्यांसाठी त्यांनी नक्की काय केलं?
 कृषिमंत्री महाराष्ट्राचा असुन सर्वात जास्त आत्महत्या फ़क्त महाराष्ट्रातंच होतात. प्रथम मोफत विजेची गाजरे दाखविली आणि निवडणूका जिंकून परत शेतकर्यांच्या तोंड़ालाच   पाने  पुसली . तोट्यात चाललेल्या बैंका वाचविण्यासाठी खोटी कर्ज माफ़ी केलि. जे शेतकरी वेळेवर कर्जाचे हप्ते भरतात त्यांना कर्ज माफ़ी नाही मात्र ज्यांनी हप्ते थकाविले आशा सर्वान्ना  मात्र १०० % कर्ज माफ़ी .
 आणि आता तर " कर्ज मफिचा कंटाळा आला आहे " असे बेजबाबदार विधान पवार साहेबांनी केले आहे. मोफत विज शेताकर्यान्नी मागितली  होती तुमच्याकडे? आमचे कर्ज माफ़ करा असे शेतकरी म्हणाला होता शेतकर्यांना मोफत विज नको आहे . तर त्याना " माफक दरात आणि मुबलक प्रमाणात विज" हवी आहे.
" शेतकरयांन्नी आर्ट ऑफ़ लिविंग  चा कोर्स करावा " ही आक्कल त्यांना शिकाविन्याची आता गरज नाहीये. घरामध्य्ये लग्नाची जवान पोरगी आहे , तिच्या लग्नाला हुंडा कोठून आणायचा?  , मुलाचे शिक्षण बाकि आहे , पाउस पडत  नाही, जमिनीत पेरलेले उगवेल  काय? बैंक जप्ती तर करणार नाही ना? आशा असंख्य संकट समोर आसताना मरणाच्या दाराशीपोहोचलेल्या  शेत कर्यान्नी "आर्ट ऑफ़ लिविंग करावा " हा फुकट चा सल्ला देवून तुम्ही त्याचा घोर अपमान केला आहे.
लोकांना आज खायला अन्न मिळत नाही आणि तिकडे गोदामात लाखो टण धान्य  तुम्ही सड़विले. शेतकर्यांचे गहू १० रुपये दराने खरेदी करायचे आणि परदेशातील सडका गहू जो त्याठिकाणी जनावरांना ही चारला जात नाही तो  दुप्पट दराने खरेदी करायचा. याला काय म्हणायचे?
 आज इकडे दुधाला चांगला भाव मिळत नाही आणि ह्यांनी तिकडून थाईलैंड  मधून दुधाची भुकटी आयात केलि. शेतकरयांन्नी  हजारो लिटर दूध ओतून संताप व्यक्त केलेल्यानंतर तिकडे त्या थाईलैंड सरकारला  जाग आली , त्यांनी निर्यात थाम्बविली पण आमच्या कृषि मंत्र्यांना काय जाग आली नाही.
शेतकरयांना  आनुदान द्यायचे म्हटले कि ह्यांच्या पोटात  गोळा  उठतो . तिजोरीत खडखड़ाट आहे असा आरडओरडा केला जातो, मग IPL  ला मात्र करमुक्त करण्यासाठी तुमच्या तिजोरीत बरा खडखड़ाट नसतो? माझ्यावरचा बोजा कमी करा , कृषि खात्याची जबाबदारी दूसरी कोनावरती दया आणि मला ICC  चा कारभार करू दया, म्हणजे कृषि खाते तुम्हाला बोजा वाटते. शेतकरी तुम्हाला निरर्थक वाटतात
पवार साहेब ,
महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकरी आत्महत्या करत असताना, सीमाभागातिल जनता ५० वर्षापासून अन्यायामध्ये जगत असताना आणि असंख्य लोक उपासमारीने मरत असताना आपण आपली सर्व  शक्ति IPL  साठी, आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी खर्च करावी कारन महाराष्ट्राच्या विकासाची आपल्याकडून आपेक्षा करने आता व्यर्थ आहे……….   
इंग्रज लोक आपल्या बांधावान्वर  आन्याय करायचे. पण एवढे काय वाटायचे नाही कारन ते परके होते पण आज आपलेच लोक आपल्या बांधावान्वर  अन्याय करतात ह्यापेक्षा दुसरे दुर्भाग्य कुठले असूच शकत नाही!!!!!

आदर्श


    खरं तर ह्याच महाराष्ट्राने दिल्लीचे तख़्त हदरविले. मराठ्यान्नी अटकेपार झेंडे लावले. तरण्या पोरींना छेड़नारया लाचार पाटलाचे हात-पाय छाटले. क्रूरकर्मा अफझल खानाचा कोथला बाहेर काढला.जुल्मी शाहिस्तेखानाची बोटे सुद्धा कापली. एवढेच काय पण इथल्या संत साहित्याने तर संपूर्ण जागालाच तत्वज्ञान शिकविले. पण माझ्या ह्या महाराष्ट्राच्या गौरवशाली आणि वैभवशाली परंपरेलाच सुरुंग लावण्याचे काम इथल्या नालायक राज्यकर्त्यांनी केले.
    ज्यांची मूर्ति लहान पण कीर्ति महान होती असे देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान 'लालबहाद्दुर शास्त्री" यांनी नारा दिला "जय जवान! जय किसान!". शेतकरी देशाचे पोट भरतील तर सैनिक देशाचे रक्षण करतील. ज्यांनी तिरंग्याच्या रक्षनासाठी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयासाठी बांधलेल्या "आदर्श" वास्तुमध्ये भ्रष्टाचार करण्याचे काम ह्या महाराष्ट्रातील राजकीय "गिधाडान्नी" करून महाराष्ट्राच्या आदर्श प्रतिमेलाच काले फासले आहे.
    इकडे कोट्यवधी लोकांना खायला दोन टाइम पोटभर अन्न मिळत नाही. कुपोषित बालकांची संख्या वाढत चालली आहे. मुलभुत शिक्षण चांगल्या प्रकारे मिळत नाही. पोषण आहारामध्ये आळ्या शिजवल्या जातात. भर दिवसा पाच वर्षाच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार केला जातोय अन सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा न्याय्य मिळविन्यासाठी सत्तर वर्षाच्या आज्जिबाई कोर्ट- कचेरया मध्ये आजही हेलपाटे मारताना दिसतात.
    पण गोर-गरीबाच्या हक्काचे, कष्टाचे अन घामाचे , ह्या देशातील तमाम जनतेचे लुबाडलेले २८० लाख कोटि रुपये स्विस बैंकेत लपविन्यात मग्न असनारया ह्या देशातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना मात्र ह्या सर्व प्रकाराचे काहीही सोयरसुतक नाही हीच मोठी खेदाची बाब आहे.
आपल्या देशाचे खरे शत्रु पाकिस्तान, दहशतवाद, नक्षलवाद हे नसून सुरेश कलमाड़ी, . राजा, अशोक चव्हाण  ह्या सारखे भ्रष्ट राजकारणी ह्या देशाचे खरे शत्रु आहेत पण  इथली लोकशाही त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही हीच मोठी शोकांतिका आहे .